Sunday, July 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्ह्यातील भुमीहीन कुटूांबाांना मिळणार चार एकर जमीन पाईकराव यांच्या मागणी यश

सुरेश मल्हारी पाईकराव संस्थापक अध्यक्ष – सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर

चंद्रपूर : सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने दिनांक 25 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती की चंद्रपुर जिल्हयातील अनुसूचित जाती (SC)/जमाती(ST), व समस्त नवबौद्ध गोरगरीब हे घटक अद्याप आपल्या पायावर उभे राहिले नसल्यामुळे आणि जे अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, व नवबौद्ध घटक दारिद्रय़रेषेखालील भुमीहीन, समाजातील विधवा व परित्यक्ता आहेत अशा व्यक्तींना निवडून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून चार एकर कोरडवाहू जमीन व दोन एकर ओलीताखालील जमीन 100% अनुदानावर देऊन त्यांचा उदरनिर्वाह करण्यास मदत करण्यात यावी. अशा गरजु कुटुंबांना आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून शेत जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. जमिन उपलब्ध होत नसल्यास आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीला प्रचलित रेडीरेकनर च्या किंमतीत जमीन खरेदी करण्यासाठी सांगावे. रेडीरेकनर च्या किंमतीप्रमाणे जमीन उपलब्ध होत नसल्यास जमीनीच्या मुल्याबाबत कोणी जमीन विकणार आहेत अश्या संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी करून जमीन उपलब्ध करून त्या जमीनीचे 100%अनुदानावर वाटप करण्यात यावे. जेणेकरून जिल्हय़ातील बेरोजगारी व गरीबी कमी होवून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल व परिस्थिती सुधारेल या द्रृढहेतुने सदर विषयात आपण ताबडतोब योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी निवेदनाद्वारे केली होती.

सदर समाज कल्याण विभाग चंद्रपूर येथील अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांनी सुरेश मल्हारी पाईकराव यांना या बाबत सविस्तर माहिती दिली. ती खालील अटीवर चार एकर शेत जमीन कुटूांबाांना मिळणार आहे

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक जमीन – 2015 /प्र. क्र. 64/अजाक, मंत्रालय, मुंबई दिनांक 14/08/2018 अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. स्वाभिमान या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय़रेषेखालील भुमीहीन कुटूांबाांना कायमचे उत्पादन स्त्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्य़ातील कुटूंबाकडुन शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्री इच्छुक शेतकर्‍याकडून 2024 – 2025 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्याने सम्मती पत्रासह पटवारी साक्षानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल.

अर्जासोबत जमीनीचा 7/12 सातबारा गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटी ची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अर्जदारचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी नाहरकत व सम्मती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीची खरेदी प्रकियेमुळे कोणतेही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीन बाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे. सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन सुरेश मल्हारी पाईकराव यांनी केले यावेळेस जगदीश मारबते राकेश पारशिवे बबन वाघमारे, विजय कवाडे, आदी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News