देऊळगाव राजा : तहसिल कार्यालय, देऊळगाव राजा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस पथकाने मानवंदना दिली. सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सर्व उपस्थितांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसगी पोलिस निरीक्षक संतोष महल्ये, माजी सैनिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.