सावली : भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ७८ व्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव राजाबाळ पा.संगीडवार, उपाध्यक्ष अनिल स्वामी, कोषाध्यक्ष डॉ.विजयराव शेंडे, सदस्य डॉ.ए.चंद्रमौली, प्रशांत राईंचवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम, नगरपंचायतचे पदाधिकारी, माजी शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या महत्वावर पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.शालेय विद्यार्थ्यांनी या प्रसंगी भाषणे दिली.कार्यक्रमाचे संचालन धनंजय गुरनुले यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी मानले.




