Saturday, December 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

ई-पीक नोंदणी होऊन सुद्धा अनेक शेतकरी मदती पासून वंचित

तातडीने सर्वाना मदत ५००० प्रति हेक्टरी सरकारने करावी :- वर्धा सोशल फोरम तर्फे अभ्युदय मेघे यांची मागणी

वर्धा : गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाची ई पीक नोंदणी करून सातबारावर तशी नोंद देखील झाली होती. या संदर्भात शासनाच्या वतीने हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. परंतु गेल्या वर्षीच्या नुकसानाची भरपाई अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही.

ग्रामीण भागात मोबाईलची रेंज नसलेले ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ई-पीक पाहणीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागते आहे. ही बाब अत्यंत चुकीची बाब असून यामुळे माझा शेतकरी राजा हवाल दील झाला आहे.

तरी आम्ही वर्धा सोशल फोरम तर्फे मागणी करतो कि ती सर्वाना ताबडतोब द्यावी. व वंचित ना न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्य १० दिवसात शेतकरी आंदोलन करतील असा इशारा सरकारला देण्यात येत आहे.

तसेच यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले असून यावेळेस देखील ई पीक पाहणी सुरू आहे. परंतु शासनाच्या वतीने यासंदर्भात शेतकऱ्यांना कोणतीही पीक पाहणीची पोचपावती देण्यात येत नाही.

आमची या निवेदनाच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती आहे अन्यथा येत्या आठ दिवसात सर्व शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून मोठा आंदोलन उभा करू.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News