Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

विदेशी दारू व चार चाकी कारसह ८,६६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त करून, गुन्हा नोंद केल्या

स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांची धडक कारवाई

वर्धा : दिनांक १६/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून आरोपी नामे सौरभ जितेंद्र भगत, वय २३ वर्ष, रा. गणेशनगर, बोरगाव (मेघे), वर्धा यांचेवर पावडे चौक, धंतोली, पोलीस स्टेशन रामनगर, वर्धा परीसरात नाकेबंदी करून त्याचेवर प्रोव्होशन रेड करून त्याचे ताब्यातील वाहनाची पाहणी केली असता वाहनात वेगवेगळ्या कंम्पनिच्या देशी, विदेशी दारू व बिअर ने भरलेल्या लहान मोठया आकाराच्या शिश्या मिळुन आल्याने त्याबाबत त्यास विचारपुस केली असता त्याने सदर विदेशी दारूचा माल प्रदीप उर्फ लाला सेठ नावाचा बार मालक रा. राजापेठ जि.अमरावती याचे कडुन विक्री करण्या करीता खरेदी करुन आणल्याचे त्यांने सांगीतल्याने सौरभ चे ताब्यातुन तिन खडर्याचे खोक्यात रॉयल स्टॅग कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या १२० शिशा किंमत ४२,०००/- रु., दोन खडर्याचे खोक्यात रॉयल ग्रिन कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या ६८ शिशा किंमत २३,८००/- रु, तिन खडर्यांचे खोक्यात आयकॉनीक व्हाईट कम्पनीच्या १८० एम.एल. च्या ७२ शिशा किंमत २५,२००/- रु., चार खडर्याचे खोक्यात ऑफीसर चॉईस कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या १ ९ २ शिशा किंमत ५७,६००/-रु, तिन खडर्याचे खोक्यात ऑफीसर चॉईस ब्लु कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या ९ ६ सिलंबद शिशा किंमत ३३,६००/- रु., एका खडर्याचे खोक्यात ऑफीसर चॉईस ब्लु कंम्पनीच्या ९० एम.एल.च्या १०० सिलंबद शिशा किंमत २०,०००/- रु., तिन खडर्याचे खोक्यात टॅगो पंच कंम्पनीच्या देशी दारुच्या ९० एम.एल.च्या २५० सिलंबद शिशा किंमत २५,०००/- रु., एका खडर्याचे खोक्यात मॅजीक मुमेंट कम्पनीच्या १८० एम.एल.च्या १२ सिलंबद शिशा किंमत ४,२००/- रु., एका खडर्यांचे खोक्यात स्पेशल संत्रा कंम्पनीच्या १८० एम.एल.च्या ४८ सिलंबद शिशा किंमत ९,६००/- रु, एका खडर्याचे खोक्यात कासबर्ग कम्पनीच्या ५०० एम.एल.च्या २४ सिलंबद बिअरचे कॅन किंमत ८,४००/- रु., एका खडर्याचे खोक्यात बडवॉयजर कंम्पनीच्या ५०० एम.एल च्या २४ सिलंबद बिअरचे कॅन किंमत ८,४००/- रु, एका खडर्याचे खोक्यात हायवई ५००० कंम्पनीच्या ५०० एम.एल.च्या २४ सिलंबद बिअरचे कॅन किंमत ८,४००/- रु. व १३ ) एक मारोती सुझुकी कंम्पनिची सियाज कार क्रमांक एम.एच. ०४ एच.एम. ७९१२ किंमत ६,००,०००/- रु. असा एकुण जु.किं. ८,६६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी व प्रदीप उर्फ लाला सेठ नावाचा बार मालक रा. राजापेठ जि. अमरावती यांचे विरूद्ध पो.स्टे. रामनगर येथे अप क्रमांक ७०३/२०२४ कलम ६५ (अ) (ई), ‘७७ (अ), ८३ म.दा.का. सह कलम ३ (१) १८१, १३०/१७७ मो.वा.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, यांचे निर्देशा प्रमाणे पोउपनी अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, पवन पन्नासे, रामकिसन ईयर, मनिष कांबळे, प्रदिप वाघ, गोपाल बावणकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, अरविंद इंगोले, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, यांनी केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News