Sunday, July 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

सिंदेवाही तालुक्यात २ हजार ८८२ कुटुंबांना मिळाला लाभ

घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण,

सिंदेवाही (चंद्रपुर) : महान संत वाल्मीक ऋषी यांचा वारसा लाभलेल्या भोई समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तथा समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटक यांची अतिशय हलाखीची परिस्थिती व जिवनमान बघून यांचेकरिता महाविकास आघाडी सरकार काळात या खात्याचा मंत्री असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. आज एकट्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. ज्या थोर वाल्मीक ऋषींनी आपल्या रामायणातून संपूर्ण जगाला प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घडवून दिले. अशा प्रामाणिक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सदैव प्रयत्न करणार.तर प्रत्येक समाजातील दुर्बल घटकांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल मिळवून देण्याची सेवा संधी हि परमोच्च आनंददायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, शबरी घरकुल योजना अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने मंचावर तालुका काँग्रेस कमिटीचे रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, तहसीलदार संदीप पानमंद, गटविकास अधिकारी विभावती तीतरे, विमुक्त जाती भटक्या जमाती चे ज्येष्ठ नेते डॉ.शिवरकर,काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम, माजी तालुका अध्यक्ष वीरेंद्र जयस्वाल, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संजय गहाने, कृउबा समिति उपसभापती दादाजी चौके, माझी परसो सदस्य राहुल पोरेडीवार, गराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, विमुक्त जाती भटक्या जमाती तालुका अध्यक्ष महेश मंडलवार, व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सिंदेवाही शहरातील एका कुटुंबाची व्यथा बघितल्यानंतर विमुक्त भटक्या जाती व जमातींकरिता विकास योजना आणण्याचा मी संकल्प केला. तर महाविकास आघाडी सरकार काळात मंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित करून हजारोंच्या संख्येने राज्यातील लाभार्थ्यांना स्वप्नातील हक्काची घरे दिली. तर संपूर्ण राज्याच्या तुलनेत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ७ हजाराहून कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला असून पुढील काळात एकही कुटुंब घरकुला पासून वंचित राहणार नाही. सोबतच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्दचे आणि शेतीसाठी उपलब्ध करून देऊन या क्षेत्रात शेती समृद्ध क्रांती घडविली. मानवतेचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ असून माणुसकी हीच जात सर्वात मोठी आहे. म्हणूनच मी मानव सेवेसाठी सदैव अग्रेसर राहून जनतेसाठी हिरीरीने काम करतो असेही ते यावेळी म्हणाले. तसेच इतर घरकुल योजनांमार्फत अनेक लाभार्थ्यांना देखील घरकुले मंजूर करून दिली. येत्या काळात आमची सत्ता येताच महागाईचा विचार करून घरकुलाच्या निधीत दुपटीने वाढ करत ३ लक्ष रुपये करू असे अभिवचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यानंतर सिंदेवाही तालुक्यातील सन २०२३-२४ मधे मंजुर एकूण २८८२ घरकुल लाभार्थ्यांपैकी नव्याने मंजूर १७४५ यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक युनूस शेख, तर प्रस्ताविक गटविकास अधिकारी विभावती तीतरे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटी सर्व सेल पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, ग्राम पातळीवरील सर्व सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने घरकुल लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News