Saturday, June 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न करेल : प्रतिभा धानोरकर

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा घुग्घुस शहरात जंगी स्वागत

घुग्घुस : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस व इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची विजयी मिरवणूक व नागरी सत्कार कार्यक्रम 19 जून रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.

सांयकाळी सात वाजता विजयी मिरवणूक काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथून निघाली
विजयी रथात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, तालुकाध्यक्ष अनिल नुरुले, काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, लक्ष्मण सादलावर, शिवसेना प्रमुख बंटी घोरपडे, प्रभाकर चिकणकर, गणेश शेंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिटटलवार, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

डिजे, फटाक्यांची आतिषबाजी, करीत जल्लोषात विजयी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने स्नेहप्रभा मंगल कार्यालय याठिकाणी पोहचली. याठिकाणी आभारसभा व नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन वतीने भव्य खासदार प्रतिभा धानोरकर तथा आमदार सुभाष धोटे यांना भव्य पुष्पहार घालून मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

शहरातील विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, भजन मंडळ, लिकर असोसिएशन, जय श्रीराम क्रीडा मंडळ, ख्रिश्चन पास्टरेट कमिटी, मुस्लिम समाज कमिटी, आदिवासी समाज बांधव, नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समिती, आशा वर्कर व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करतांना आ.सुभाष धोटे यांनी भाजप नेत्यांवर हल्ला चढवित ही निवडणूक आम्ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढविली व आपण सर्वांनी आम्हाला मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी केले. आम्ही आपले आभार लोककार्यतुन व्यक्त करू असे मनोगत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय संबोधनात खासदार धानोरकर यांनी आपला विजय मतदारांना समर्पित करीत घुग्घुस शहरातील महिलांच्या रोजगार प्रश्ना साठी विशेष प्रयत्न करणार, आशा सेविकांच्या समस्या निवारण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी करिता कामाला लागण्याचे ही आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन देव भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत उरकुडे यांनी केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News