महिला काँग्रेसची आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदनातून मागणी
घुग्घुस (चंद्रपुर) : महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी 4 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण देणे माता व बालक यांचे आरोग्य आहार कुपोषण व अन्य बाबीकडे लक्ष देण्यासाठी अंगणवाडीची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र शहरातील अंगणवाडी या भ्रष्टाचाराचे केंद्र झालेले आहे.
गरोदर महिलांना शासना कडून नवजात बालकां करिता मोफत मिळणारी किट हे, अंगणवाडीतील शिक्षिका व मदतनीस शँभर रुपयांना विकतात पोषक आहारातील अन्न धान्य स्वतःच्या घरी नेतात वेळेवर अंगणवाडी उघडल्या जात नाही.
काही ठिकाणी एकाच अंगणवाडीत दोन आंगणवाडीतील बालकांना शिकविल्या जात आहेत
तर काही अंगणवाडी या फक्त कागदावरच दाखवून शासकीय व वेतन योजनांचा लाभ घेतला जात असल्याचे अनेक तक्रारी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांना प्राप्त होताच त्यांनी जनता दरबारा करिता घुग्घुस जनसंपर्क कार्यलयात आलेल्या आमदार कीशोर जोरगेवार यांची महिला सोबत भेट घेत अंगणवाडीत सुरळीतपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराची माहिती दिली. तसेच शासनातर्फे गरोदर महिलांना मिळणारा पोषक आहार हा अत्यंत सडक्या स्वरूपात येत असल्याने गरोदर माता व बालकांच्या आरोग्याचा जीवघेणा प्रश्न निर्माण झालेला आहे. या गंभीर प्रकरणाकडे ही लक्ष देण्याची मागणी ही शिष्टमंडळाने केली.
याप्रसंगी महिला काँग्रेसच्या सचिव पदमा त्रिवेणी, चंदाताई दुर्गे, अनुसया ननावरे, अश्विनी धुर्वे, श्रीवास्कर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.