Wednesday, May 6, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या परीक्षांकरिता टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक १ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार आहे.

प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरील Candidates Information >Instructions>General Instructions येथे ‘Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे, असे आयोगाने कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News