Friday, April 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पोलीस विभागाने लोकसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजावावी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

पुणे : निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी पाहता आगामी लोकसभा निवडणुक कालावधीत पोलीस विभागाने आपली भूमिका चोख बजावावी, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा मतदानसंघाच्यावतीने निगडी येथील पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चौबे बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, समन्वय अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, तहसीलदार जयराज देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पोलीस दलातील जवान, कर्मचारी उपस्थित होते.

चौबे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपअंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावणेही महत्वाचे आहे. यासाठी येत्या १३ मे रोजी शहरात होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सिंगला म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. विविध जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवड शहरात कामकाज करण्यासाठी येणाऱ्या आणि शहराबाहेर मतदान असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस जवानांनी मतदानाची शपथ घेतली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News