Wednesday, July 9, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2024-25 करिता अर्ज मागविण्यात येत आहे.

जिरायत जमीन चार एकर व बगायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा सातबारा, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी नाहरकत व संमती प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.

सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दिनांक 15 मे 2024 पर्यंत संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News