रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील खानू प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ.भास्कर जगताप, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी ए.पी.जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून शुभारंभ करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ.भास्कर जगताप आदी उपस्थित होते. सुरुवातीला धन्वंतरी मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.




