Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न

घुग्घुस (चंद्रपुर) : वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून कुशाल मेश्राम महारष्ट्र सदस्य, प्राध्यापक सोमाजी गोंडणे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, कविता गौरकर जिल्हाध्यक्ष महिला, अँड.अक्षय लोहकरे जिल्हा महासाचिव, मधुकर उराडे जिल्हा महासचिव, नागेश पथाडे जिल्हा महासचिव, भगीरथ वाकडे निरिक्षक, धर्मेंद्र शेंडे तालुका अध्यक्ष, प्रज्ञा ठमके तालुका महासचिव, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचीत बहुजन आघाडी
नवनियुक्त घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, यांच्या नेतृत्वात घुग्घुस शहर येथे दिनांक. 2 मार्च 2024 रोजी, भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह लुंबीनी नगर घुग्घुस येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी म्हणून लाभलेले वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने यांच्या अध्यक्षतेखाली व घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वा मध्ये शेकडो महिला व पुरुष यांनी पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने व अण्य जिल्हा पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश घेणाऱ्यास
रमाबाई सातारडे, माधुरी चन्नुरवार, नैना कन्नाके, अश्विनी सातपुते, स्मिता कांबळे, जयोती बेंडले, शोभाबाई भालशंकर, सविता मंडपे, वनिता निखाडे, यशोधरा धोटे, कुमुद निखाडे, रंजना राऊत, संगिता वासेकर, आम्रपाली करमनकर, विजय कवाडे, बबन वाघमारे, मिना गुडदे, मंगेश रामटेके व समस्त पक्ष प्रवेश करणार्‍यास वंचित बहुजन आघाडी चा दुप्पटा व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने साहेब यांनी सर्वांना समोरील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे संचालन रिता देशकर, तर आभार प्रदर्शन माया सांड्रावार, केंद्रीय शिक्षिका यांनी करून व सर्व उपस्थितांना अल्पोपाहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळेस वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे महासचिव, अशोक भगत कोषाध्यक्ष, राकेश पराशिवे संघटक, आशिष परेकर आयटी सेल प्रमुख, विशाल भगत, नकुल निमसटकर, सदस्य राकेश कातकर सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News