चंद्रपूर : शेणगांव, सदगुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी सत्संगचे आयोजन परमपूज्य मिना अशोक मत्ते, ज्ञान प्रचारक चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये रविवार १७ मार्च २०२४ ला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यत किसान भवन, शेणगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी या आध्यात्मिक सत्संगचा लाभ घ्यावा तसेच शेणगांव गावाचा वाढदिवस साजरा करण्या करिता लेझीम, भजन, रयाँली, ढोलतास्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शालिक खनके, साधसंगत, गावकरी मंडळी मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहे असे प्रकाश सुरजागडे चंद्रपूर यांनी कडविले.