मानव हत्याचा गुन्हा दाखल का करावा नाही – आप चा प्रशन?
घुग्घूस (चंद्रपूर) : वेकोली (WCL) च्या प्रदूषणाने त्रस्त होत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली बहिरम बाबा देवस्थान परिसरात दिनांक 07 मार्च रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
दिनांक 27/02/2024 रोजी आम आदमी पार्टी मार्फत स्थानी लोकांनी वे.को.लीला निवेदन देण्यात आले होते. निवेदन मार्फत बैरमबाबा देवस्थान समोरील रस्त्यावर पाणी मारण्याकरिता आणि वायू प्रदूषण कमी करण्याकरिता मागणी केली होती परंतु वेकोलीचा या विषयाकडे सततचा होत असलेला दुर्लक्ष पाहून स्थानीय लोकांनी आम आदमी पार्टी सह चक्काजाम आंदोलन केला.
स्थानीय लोकांच्या मागणीवर आणि आम आदमी पार्टी अध्यक्षच्या विनंती वर संजीवनी पर्यावरण संस्था, चंद्रपूर चे अध्यक्ष राजेश बेले सुद्धा या आंदोलनाला सहभागी झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर बहादुरे यांनी आंदोलनाचा ठिकाणी निरीक्षण कराला आले आणि जाच करत उच कारवाही करू असा आश्वासन दिला.
सोबतच प्रदूषण मुळे बऱ्याच लहान मुलांना कॅन्सर, दमा, अस्थमा, केस गळणे, त्वचारोग, टी बी, ब्रोकासिस, कुष्टरोग, डोळ्यांचा आजार, अश्या अन्य बिमाऱ्याचा आजार दिसून येत आहे तरी स्थानीय लोकांची मेडिकल चेक्कुप सुधा लवकरात लवकर करण्यात यावा आणि घुग्घुस नगरपरिषदच्या मुख्याधिकारी वर तसेच वे.को.ली अधिकाऱ्यांवर मानव हत्याकांड चा गुन्हा दाखल करा अशी मागणी सुधा आम आदमी पार्टी (तथा नवयुवक बौद्ध मंडळ )अध्यक्ष इंजी.अमित बोरकर कडून करण्यात आली.
समजा नियमाप्रमाणे पूर्ण इमानदारीने सर्वे करण्यात आला तर घुग्घुस शहर हा भारतात सर्वात प्रदूषित शहर आहे असे सिद्ध होणार असं म्हणता येतील.
या वेळेस राजेश बेले,अमित बोरकर, राकेश सलामे,संध्या रामटेके,निळा चिवडे, किरण सलामे, कविता परागे, लता नगराडे कमलाकर, अर्चना चिवडे, रुपेश सोदारी, यासीन शेख, सोनी शेख, स्नेहलता दुर्गम, वेणूबाई सोमवले, सुनील सातपुते, आदर्श आगदारी, हमीद यादव, इस्तेयक रहमत, शुष्मा चांदेकर, शंकर ,राहुल कुशवाह राहुल तालापल्ली, परमेश्वर चालकुरे, अश्विनी पाटील, अनिता कासवटे आदी उपस्थित होते.