Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तीन राज्याच्या विजयाचा जल्लोष

घुग्घुस (चांद्रपुर) : भाजपातर्फे रविवार, ३ डिसेंबर रोजी सायंकाळी तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले व भाजपाने घवघवीत विजय संपादित केला. त्याअनुषंगाने ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयूमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात तीन राज्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतडासमोर मेणबत्ती प्रज्वलन करून व माल्यार्पण करून अभिवादन करून शहरात ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जुना बसस्थानक, गांधी चौक, आठवडी बाजार मार्गे मार्गक्रमण करीत नवीन बसस्थानक चौकात मिरवणूक समाप्त करण्यात आली. ठिकठिकाणी फटाके फोडून व फाटक्याची आतिशबाजी करून लाडू वाटप करण्यात आले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, सिनू इसारप, साजन गोहणे, विनोद चौधरी, चिन्ना नलभोगा, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, गुड्डू तिवारी, अमोल थेरे, नितीन काळे, विनोद जंजर्ला, गणेश कुटेमाटे, सतीश बोन्डे, सुरेंद्र भोंगळे, सचिन कोंडावार, मानस सिंग, सुरेंद्र जोगी, ललित होकम, विशाल नागपुरे, अंकेश मडावी, सागर तांड्रा, रामस्वामी पुनम, आकाश निभ्रड, दिनेश बांगडे, आरिफ शेख, श्रीकांत बहादूर, विक्की सारसर, गौरव ठाकरे, अमीना बेगम, सुनंदा लिहीतकर व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News