घुग्घुस (चंद्रपुर) : वाहनाची धडक, अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. स्मित पगडी (२० वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून घुग्घुस पोलीस अधिक तपास करत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा इंदिरा नगर येथील रहिवासी आहे. ही घटना काल रात्री (13 डिसेंबर 2023) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. एमएच 29 बीसी 8276 क्रमांकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




