घुग्घुस (चंद्रपूर) : विजय वडेट्टीवार यांचा शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी घुग्घुस येथील ख्रिश्चन समाजातर्फे सत्कार करण्यात आला. येथील स्व.प्रमोद महाजन मंचावर घुग्घुस काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आली. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाला. त्यासाठी भव्य नागरी सत्कार व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांचा घुग्घुस येथील ख्रिश्चन समाजातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सध्या पास्टर रमेश नातार, पास्टर संदीप आर्मुल्ला, पास्टर वेलसेली कलगुर, येसुदास आर्मुल्ला, पास्टर देविदास चिल्का, पास्टर अशोक अतकूर, सुदर्शन आर्मुल्ला, स्टीवन गुंडेट्टीवार, सुरेश डिकोंडा, थॉमस अर्नाकोंडा, ज्येष्ठ नेते तिरुपती महाकाली, रोहित आर्मुल्ला, प्रणय लिंगमपेल्ली, लड्डू सिल्का, चांटी अरमुल्ला, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सुनील सिलका, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस रोहित मंडल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.