घुग्घुस (चंद्रपुर) : येथील पद्मशाली समाजा तर्फे शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. घुग्घुस काँग्रेस तर्फे येथील प्रमोद महाजन मंचावर महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात घुग्घुस येथील पद्मशाली समाजा तर्फे विजय वडेट्टीवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणुन सरचिटनिस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा अध्यक्षा विजय क्रांती संघटना शिवानी वडेट्टीवार, माजी चंद्रपूर काँग्रेस कमेटी (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जेष्ठ नेते विनायक बांगडे उपस्थित होते.
यावेळी पद्मशाली समाज घुग्घुसचे अध्यक्ष सिनू गुडला, सचिव राहुल पप्पूलवार, कोषाध्यक्ष श्रीरामलू मामीडाला, सह कोषाध्यक्ष राजू चिप्पावार, समाजाचे जेष्ठ नागरिक सत्यनारायण अंदेवार, अशोक गुंटुकवार, रवी मुश्मा, राजू येनगंदलवार, पोलू राजेशम, सुरेश ताला, राजू मुश्मा, महिला अध्यक्ष सुषमा चिप्पावार, कोषाध्यक्ष रामादेवी येनगंदलवार, संगीता येनगंदलवार, किरण अमोलवार, शोभा चिप्पावार, सपना बर्लावार व समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.