Wednesday, July 9, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मी तुमच्या ईडीला घाबरणारा नाही : विजय वड्डेटीवार

घुग्घुस (चंद्रपुर): राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचा नागरी सत्कार सोहळा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शहरात ढोल ताश्याच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली तसेच जेसीबी मधीनने फुलांचा वर्षाव करण्यात आला व जागोजागी आतिषबाजी करून जल्लोषात विरोधीपक्ष नेत्यांचा स्वागत करण्यात आला. स्व.प्रमोद महाजन मंच घुग्घूस येथे नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत उरकुडे यांनी पदाधिकाऱ्या सह वड्डेटीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. उरकुडे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवाशाने काँग्रेस मध्ये नवचैतन्य संचारले. दिप प्रजवलन व थोर पुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात वड्डेटीवाराने भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीचा धाक दाखवता मात्र मी तुमच्या ईडीला घाबरणारा नाही
मी जेलात जाईल पण भाजपात जाणार नाही उपस्थित जनसमुदाया समोर भीष्म प्रतिज्ञा केली. शिवसेना, राष्ट्रवादीचे व अन्य पक्षाचे नेते भितीपोटी भाजपा सोबत गेले मात्र काँग्रेस पक्ष हा या डबल इंजिन सरकारच्या जनविरोधी निर्णया विरोधी ठाम उभा आहे व भविष्यात ही सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहील तुम्ही पंचीवीस वर्षांपासून नगरपरिषदेची प्रतीक्षा करीत होते त्यांनी फक्त आश्वासनच दिले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात ही तुमच्याखातर ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात केली तुम्ही येणाऱ्या निवळणूकीत काँग्रेसला विजयी करा या शहराचा कायापालट करतो असे आश्वासन ही नागरिकांना दिले.

युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वड्डेटीवार यांनी शासकीय नोकरीत कंत्राटीकरण व शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणाला घेऊन राज्य शासनाचा निषेध केला.

याप्रसंगी मंचावर माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगळे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रवीण पडवेकर, रमजान अली, प्रदेश सचिव शिवाराव, युवक अध्यक्ष राजेश अडडूर, लक्ष्मण सादलावार, प्रवीण लांडगे कामगार नेते, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, नारायण ठेंगणे, जयंता जोगी, मुन्ना भाई लोहानी, बाबा कुरेशी, शामराव बोबडे, महिला शहर अध्यक्ष संगिता बोबडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, एस.सी सेल महिला शहर अध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, जिल्हा सचिव मंगला बुरांडे, माजी शहर अध्यक्ष विजया बंडी, वढा सरपंच किशोर वरारकर, पांढरकवडा माजी सरपंच सुरज तोतडे, सुधाकर बांदूरकर, एस.सी.सेल अध्यक्ष विक्रम गोगला, एस.सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, युवक महासचिव सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, अलिम शेख, मोसीम शेख, अल्पसंख्याक काँग्रेस नेते सुनील चिलका, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी शहर अध्यक्ष जावेद सिद्दीकी, माजी सभापती शोभा ठाकरे, एस.सी.सेल माजी अध्यक्ष पवन आगदारी यांनी केले. सूत्र संचालन साहिल सैय्यद तर आभार प्रदर्शन लखन हिकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News