घुग्घुस : तान्हापोळा, गणपती, दुर्गाउत्सव आयोजक समिती व भाजपातर्फे शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी गांधी चौकात नंदीबैल सजावट स्पर्धा संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे म्हणुन, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, ठाणेदार आसिफराजा शेख, कामगार नेते लक्ष्मण सादलावार, चिन्नाजी नलभोगा, संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, नितु चौधरी, संतोष नुने, सिनू इसारप, साजन गोहणे, विनोद चौधरी, पूजा दुर्गम, सुचिता लुटे, लक्ष्मी नलभोगा, वैशाली ढवस, संजय भोंगळे, सहा. पो. नि. प्रशांत साखरे, उपपोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, अमीना बेगम, रज्जाक शेख, प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर उपस्थित होते.
मोठया संख्येत बाल गोपाळ स्पर्धकांनी भाग घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक २००१/- रुपये, द्वितीय पारितोषिक १५०१/- रुपये, तृतीय पारितोषिक १००१/- रुपये व शिल्ड विजेत्या स्पर्धकांना देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गणेश कुटेमाटे, पियुष भोंगळे, गौरव ठाकरे, गजानन जोगी, शुभम जेऊरकर, राहुल ठाकरे, परिमल नांदे, मंगेश राजूरकर, असगर खान, उमेश दडमल, प्रणय बोकडे यांनी प्रयत्न केले.
यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.