Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

रेती घाटांच्या निविदेच्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर : सन 2023-24 या वर्षाकरीता जिल्ह्यातील वाळूगटाच्या राज्यस्तरीय (SEAC व SEIAA) पर्यावरण समितीची अनुमती मिळण्याकरीता अर्ज सादर करावयाचे आहे. त्याकरीता जिल्ह्यातील वाळूगट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वाळू/रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय नोंदविण्याकरीता http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर अहवालातील रेती घाटांच्या निविदेच्या अनुषंगाने अभिप्राय उपरोक्त संकेतस्थळावर नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News