Wednesday, May 6, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करा : विवेक बोढे

घुग्घुस (चंद्रपुर) : शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची तत्काळ दुरुस्ती करा अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय निर्माण करण्यात आले आहे. परंतु अनेक शौचालयाच्या सिटांना मुख्य टाकीसोबत जोडण्यात आले नाही.

त्यामुळे ते नागरिकांच्या वापरात आले नाही. काही शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्यात आली होती आणि ते सुरु ही झाले होते. परंतु आता पाईपलाईन खराब झाली आहे त्यामुळे ते शौचालये अस्वच्छतेमुळे बंद पडली आहे.

अनेक शौचालयाजवळ घाण कचरा साचला आहे. शहरातील अनेक सार्वजनिक शौचालये बंद अवस्थेत असल्याने महिलांना व नागरिकांना याचा नाहकत्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या लक्षात घेत भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची न.प.कार्यालयात भेट घेतली व चर्चा केली आणि निवेदन दिले.

यावेळी भाजपाचे संतोष नुने, शाम आगदारी, किशोर घनकसार, सचिन बोन्डे, इर्शाद राईन, उत्तम उपरे, शंकर कटकुरवार, सुनील वावरे, विक्की यादव, राहुल मेश्राम, काशी यादव, अजय साहू, अक्षय यादव सुनील कोहाड, संतोष लोखंडे आदींची उपस्थिती होती.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News