Monday, May 25, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बंद पडलेल्या (बोरिंग) हातपंप दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याची टाकीची सुविधा करा शरद : पाईकराव

घुग्घुस (चंद्रपुर) : वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून दिनांक. 06 मार्च 2024 रोजी राजेश बोरकर जिल्हा प्रभारी, प्राध्यापक सोमाजी गोंडाणे जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर, ॲड.अक्षय लोहकरे जिल्हामहासचिव, धर्मेंद्र शेंडे तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस, नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की घुग्घुस प्रभाग क्र.10 येथील विजय प्रिंटिंग प्रेस यांच्या घरा समोरील दोन वर्षा पासुन बंद पडलेली (बोरिंग) हातपंप मुळे तेथील स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना घरकाम करण्यासाठी आजु बाजूच्या वार्ड मध्ये जाऊन पाणी आणून आपल्या गर्जा पूर्ण करत आहे. पाणी भरण्यासाठी तेथील नागरीक नळाचा पाण्याची वाट पाहात असतात. परंतु पाण्यामुळे त्यांच्या रोजगार बुळु शकतो. याची सुध्दा भीती तेथील नागरिकांना सतत वाटत असते. कारण तेथील नागरिक कुणी शेत मजुरी करतात तर, कुणी बांधकाम मजुरी करण्यासाठी जातात. ज्या मुळे त्यांना नळाचे पाणी सुध्दा मिळत नाही.

आता ऊन्हाळा लागत आहे. आणि ऊन्हाळयात आपल्या घुग्घुस शहराचे तापमान सुध्दा मोठ्या प्रमाणात असते. आणि सर्वात जास्तीत जास्त पाण्याची गरज या तीन ते चार महिन्यांत खुप जास्त भासते. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर बंद पडलेली (बोरिंग) हातपंपाची दुरुस्ती करण्यात यावी. त्या (बोरिंग) हातपंपाच्या जागी एक पिण्याच्या पाण्याची टाकीची सुविधा करून देण्यात यावी. जेनेकरुन तेथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल.

असे निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, महासचिव अशोक भगत, कोषाध्यक्ष राकेश पराशिवे, संघटक आशिष परेकर, आयटी सेल प्रमुख नकुल निमसटकर व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News