पंचमुखी हनुमान मंदिरात अभिनंदनाचा कार्यक्रम; इंजि. चेतन बोबडे, अॅड. रोशन बंडी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
प्रणयकुमार बंडी
घुग्घूस, चंद्रपूर : किरण संजय देरकर यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पंढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात साबुदाणा खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून किरण संजय देरकर यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. धार्मिक आणि सामाजिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात मंदिरात येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला इंजि. चेतन बोबडे, निशांत ठाकरे, अॅड. रोशन बंडी, कृष्णा कंदुकुरी, किशोर चौधरी, गोपी अण्णा आणि हर्ष चौधरी यांची उपस्थिती होती.
किरण संजय देरकर यांच्या निवडीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून आनंद व्यक्त करत त्यांना पुढील सामाजिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




