Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर: दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन अर्ज सुरू – 15 जुलैपर्यंत संधी

चंद्रपूर | केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी अर्ज आणि नामांकन ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 15 मे 2025 पासून 15 जुलै 2025 पर्यंत www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात.

पुरस्कार प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन अर्जच ग्राह्य धरले जाणार असून, प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना पोर्टलवर दिलेल्या विशिष्ट नमुन्यात सविस्तर माहिती व प्रेरणादायी कार्य नमूद करणे आवश्यक आहे.

या पुरस्कारासाठी पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया आणि इतर आवश्यक मार्गदर्शक सूचनांची माहिती दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर – www.depwd.gov.in उपलब्ध आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांच्या उल्लेखनीय कार्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळू शकेल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News