Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस पोलीसांची यशस्वी कारवाई : वर्षभरापासून फरार आरोपीला अटक, 3.47 लाखांचे सर्वे मशीन जप्त

चंद्रपूर : घुग्घुस पोलीस स्टेशन येथील अप.क्र. 334/24, कलम 305 A BNS अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी प्रदीप बिरादार (वय 27, रा. होनाळी, ता. देवणी, जि. लातूर) याला अखेर घुग्घुस पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मदतीने अटक केली आहे.

आरोपी प्रदीप बिरादार मागील एका वर्षापासून पोलिसांच्या नजरेतून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी बेंगळुरू, पुणे, लातूर या ठिकाणी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या, मात्र तो सापडत नव्हता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे मौजा होनाडी, ता. देवणी, जि. लातूर येथून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले 3,47,000 रुपये किमतीचे सर्वे मशीन जप्त केले असून, गुन्ह्याचा महत्त्वाचा सुराग उकलण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन तायवाडे, पोहवा संजय आत्तकुलवार (ब. क्र. 2215), पो. अ. सचिन वासाडे (ब. क्र. 193), व पो. अ. प्रसन्नजित डोर्लिकर (ब. क्र. 2823) यांच्या पथकाने केली.

घुग्घुस पोलीस ठाण्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दल सक्रियपणे कार्यरत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News