Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चोरी-घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आणि त्याचे तीन साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

वर्धा – टेलिकॉम नगर, म्हसाळा येथे घरफोडी करून चोरलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने अवघ्या काही दिवसांत हस्तगत करत, तीन आरोपी व एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एक सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी अनेक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

घटनेचा तपशील:

फिर्यादी जालना येथे आपल्या मुलाकडे गेले होते. काही दिवसांनी परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात तपासणी केली असता, टिव्ही, पितळी मूर्ती, तांब्याचे गुंड व अन्य सजावटीचे साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. यावरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (गु.र. 866/2025, कलम 305(a), 331(3)(4), 3(5) भा.न्या.सं.)

तपासाची दिशा:

स्थानीय गुन्हे शाखा वर्धाचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना 06 जून 2025 रोजी गोपनीय माहितीवरून शाहिद शाकीर खान पठान (वय 18, रा. मिलींदनगर, म्हसाळा) याच्या घरी छापा टाकला असता, चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल आढळून आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या मामा अरबाज सत्तार खान पठान (वय 23, रा. तळेगाव), प्रज्वल किसना हुके (वय 23, रा. आनंदनगर, पुलफैल), आणि एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून गुन्हा केल्याचे सांगितले.

इतर गुन्ह्यांची उकल:

शाहिद पठान याने पुढील चौकशीत देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव (नि.) येथे एका बंद दुकानातून नगदी 8,000/- रूपये चोरी केल्याची कबुली दिली असून त्यातील 5,000/- रूपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित 3,000/- रुपये आरोपींनी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.

यातील प्रमुख आरोपी अरबाज पठान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी विविध पोलीस ठाण्यांत (देवळी, कारंजा, अल्लीपुर) चोरीच्या गुन्ह्यांमध्ये प्रकरणे दाखल आहेत आणि तो काही गुन्ह्यांमध्ये फरार होता.

पोलीसांची कामगिरी:

या कारवाईत वर्धा शहर व देवळी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमधील एकूण 1,23,000/- रूपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेली मोपेड यांचा समावेश आहे, जप्त करण्यात आला आहे. तीन गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पो.उपनि. बालाजी लालपालवाले, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, गजानन दरने, रवि पुरोहित, विनोद कापसे व राहुल लुटे यांनी पार पाडली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News