Wednesday, June 24, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

निराधार लाभार्थ्यांची मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मोठी गर्दीसेवेसाठी केंद्र सदैव तत्पर – विवेक बोढे यांचे आवाहन

घुग्घुस (चंद्रपुर)– येथील मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रामध्ये ‘निराधार योजना’ अंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी शेकडो लाभार्थ्यांनी केंद्राला भेट दिली.

शासनाच्या निर्देशानुसार निराधार योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक झाले आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सेवा केंद्रात धाव घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर सेवा केंद्रातर्फे नि:शुल्क ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सेवा दिली जात असून, आतापर्यंत शेकडो लाभार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यात आलेला आहे. गोर-गरिबांना कोणतीही अडचण न येता सेवा मिळावी, यासाठी केंद्राचा कर्मचारी वर्ग सतत कार्यरत आहे.

या उपक्रमाबाबत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी माहिती देताना सांगितले की, “मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र हे सर्वसामान्य, गरजू नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहे. लाभार्थ्यांनी कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगता केंद्राशी संपर्क साधावा आणि नि:शुल्क जीवन प्रमाणपत्राची सुविधा घेऊन योजना सुरु ठेवावी.”

गरजूंनी केंद्राशी संपर्क साधून ही महत्त्वाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News