Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महावितरण कार्यालयात रात्री पाळीत कर्मचारी नियुक्त करा, हेल्पलाईन नंबर जाहीर करा – काँग्रेसची मागणी

घुग्घूस (जि. चंद्रपूर): चंद्रपूर जिल्हा सध्या देशातील सर्वात उष्ण जिल्ह्यांपैकी एक ठरत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक शहर घुग्घूस येथे प्रचंड उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसाचे कडक उन्ह सहन करून रात्रभर शांत झोप मिळावी, अशी अपेक्षा असतानाच वारंवार रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

महावितरण कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर न फोन लागतो ना कार्यालयात कोणी उपलब्ध असतो, अशा तक्रारींनी हैराण झालेल्या नागरिकांनी काँग्रेस कार्यालयात धाव घेतली. याची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता भटरकार यांची भेट घेतली. त्यांनी याबाबत निवेदन सादर करत रात्रीच्या पाळीत कर्मचारी नियुक्त करण्याची व नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्याची मागणी केली.

मुख्य अभियंता भटरकार यांनी काँग्रेसच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत दोन-चार दिवसांत रात्रीच्या पाळीत दोन कर्मचारी नियमित ठेवण्याचे व नवीन हेल्पलाईन नंबर जाहीर करण्याचे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलीम शेख, तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील, विजय माटला, एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका, कपिल गोगला, दिपक पेंदोर, रोहित डाकूर, नुरुल सिद्दीकी, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, अरविंद चहांदे, कुमार रुद्रारप, दिपक कांबळे, शहंशाह शेख, अंकुश सपाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता महावितरणने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News