नागपुर : विदर्भात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज अकोला येथे सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातही उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस होते.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




