Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड व व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनमध्ये ₹1.31 कोटींचा सामंजस्य करार

मुंबई: स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड व व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF) यांच्यात ₹1.31 कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा निधी संभाजीनगर जिल्ह्यातील ओसाड जमिनीला हरित करण्याच्या प्रकल्पासाठी देण्यात आला आहे.

या करारांतर्गत स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमामुळे ओसाड व उपयोगात नसलेल्या जमिनींवर वृक्षारोपण व जलसंधारणाच्या माध्यमातून पर्यावरण सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

या प्रसंगी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हा उपक्रम पर्यावरण सुधारणा आणि कृषीक्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News