बीड : बीड तालुका पुरवठा विभागाने गेले वीस वर्षे कार्यरत असलेल्या हमालांना हक्काच्या मजुरीपासून वंचित करणे हे बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बीड गोदाम हमालांनी माथाडी बोर्डासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ बादाडे करत आहेत.
हमालांनी मागणी केली आहे की, माथाडी बोर्डाने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच हमालांना पुन्हा पूर्ववत कामावर घेण्यात यावे. गेल्या काही वर्षांपासून हमालांना कामापासून दूर ठेवल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या आंदोलनामुळे माथाडी बोर्ड आणि पुरवठा विभागावर दबाव वाढला असून, हमालांच्या मागण्यांबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




