Monday, June 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नगरपरिषद घुग्घुस तर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

घुग्घुस (चंद्रपुर) : २६ जानेवारी २०२५, नगर परिषद घुग्घुस अंतर्गत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण कार्यालयीन महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन सुसूत्रपणे पार पडले आणि उपस्थित महिलांनी आनंदाने सहभाग घेतला.

नगर परिषद घुग्घुसतर्फे महिलांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातात, ज्यामुळे त्यांना सामाजिक सन्मान मिळतो आणि त्यांचे मनोबल वाढते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News