यवतमाळ : डाक विभागाने राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त “सुकन्या समृद्धी योजना” अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.
0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींसाठी या योजनेच्या खात्याचे फायदे सांगण्यासाठी डाक कर्मचारी शाळा, अंगणवाडी आणि घराघरात जाऊन जनजागृती करत आहेत.
सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन बचत योजना असून, ती मुलींच्या उच्च शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक पाठबळ देते. अधीक्षक गजेंद्र जाधव यांनीही पालकांना आपल्या मुलींच्या भविष्यासाठी ही योजना स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.




