चंद्रपूर : आज बुधवार, दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीपद गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, आम आदमी पार्टीचे घुग्घुस माजी शहराध्यक्ष इंजी. अमित बोरकर, काँग्रेस कार्यकर्ते गणेश उईके (घुग्घुस ग्रामपंचायत माजी सदस्य), काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन नागपुरे व जुमनाके यांनी शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला शिवसेना वरिष्ठ नेते बाळू चिकनकर, अजय जोगी, घुग्घुस शहराध्यक्ष बंटी घोरपडे, योगेश भांदक्कर, प्रभाकर चिकनकर, रघुनाथ धोंगळे आणि वेदप्रकाश मेहता उपस्थित होते.
या प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा) गटाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




