Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पंचशील ध्वज दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

वर्धा : वर्ध्यात पंचशील ध्वज दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बौद्ध धर्माचा प्रतीकात्मक धम्म ध्वज पहिल्यांदा 28 मे 1885 रोजी वैशाख पौर्णिमेला फडकवण्यात आला होता. नंतर, 1952 साली याला आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून मान्यता मिळाली.

दरवर्षी 8 जानेवारीला धम्म ध्वज दिवस साजरा केला जातो. या ध्वजाचे पाच रंग – निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि केशरी – पंचशीलाचे प्रतिनिधित्व करतात. काही देशांमध्ये केशरी रंगाऐवजी गुलाबी रंगाचा वापरही होतो.

यावेळी वर्ध्याच्या सिव्हिल लाईन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. भीम टायगर सेना व बौद्ध अनुयायांच्या नेतृत्वाखाली धम्म ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमात विशाल रामटेके, पराग धवन, वसंता भगत, सोनू कांबळे, पंकज लभाणे, आणि इतर अनेक अनुयायी सहभागी झाले होते. या निमित्ताने बौद्ध धर्माच्या मूल्यांचे स्मरण करून सामाजिक एकता आणि शांतीचा संदेश देण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News