घुग्घुस (चंद्रपूर) : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष जावेद सिद्दीकी यांच्या निवासस्थानापासून चंद्रपूर विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या प्रचाराचा सोमवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रचाराचे नारळ फोडून ढोलताश्यांचा गजरात प्रचाराला सुरुवात करण्यात आली. घरोघरी जाऊन काँग्रेसचा प्रचार करण्यात आला.
चंद्रपूर विधानसभेकरीता मविआचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण पडवेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यांच्या प्रचारार्थ घुग्घुस काँग्रेसतर्फे प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी जि.प. सदस्य जयंता जोगी, आयटक युनियनचे नेते मुरली चिंतलवार, माजी सरपंच शोभा ठाकरे, काँग्रेस नेते गणेश उईके, अनु.जाती विभागाचे तालुका अध्यक्ष राजकुमार उर्फ दादू वर्मा, बंडू गायकवाड, कामगार नेते अशपाक शेख, सिद्धार्थ बोरकर, म्हातारदेवीचे माजी सरपंच संजय टिपले, पवन नागपुरे, रमेश रुद्रारप, अभिश गोहकार, सतीश सोनारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




