Saturday, May 2, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

… सर्व जिल्हा परिषद व खाजगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कॉन्व्हेंट शाळांमधील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करा व सीसीटीव्ही कॅमेरा बसवून योग्य पारदर्शी व्यवस्थापन करा : सुमित कोहळे

घुग्घुस (चंद्रपूर) : बदलापूर घटनेच्या पार्श भूमीवर सर्व शाळेत अनुचित प्रकारावर आळा घालण्याकरीता शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून प्रमाणपत्र प्रशासनाला जमा करावे तसेच तत्काळ सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसून प्रशासन व्यवस्थापना मध्ये नीटनेटकेपणा पारदर्शकता तसेच अनुचित घटना टाळता याव्या अशा प्रकारे शालेय प्रशासन व व्यवस्थापनाला तातळीचे आदेश देण्यात यावे. योग्य कारवाई न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सदर निवेदनातील समस्येची गांभीर्याने दखल घेऊन योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यात यावे अन्यथा शाळा बंद करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. असे एक निवेद नगर परिषद कार्यालयात देण्यात आले आहे.

याप्रसंगी घुग्घूस शहर उपाध्यक्ष सुमित कोहळे, कामगार सेना शहर अध्यक्ष श्रीकांत देठे, सर्कल अध्यक्ष घुग्घुस निखिल बोबडे, शाखा अध्यक्ष घुग्घुस रोशन जांभुळे, शाखा उपाध्यक्ष घुग्घुस आकाश सोनटक्के, विभाग अध्यक्ष घुग्घुस अमित येमनुरवार, विभाग उपाध्यक्ष घुग्घुस रोशन मांढरे, विभाग संघटक घुग्घुस आदित्य गजभये, शुभम तिगलवार, गीतेश डोंगे, शुभम कोयडवार, रोशन कडपते आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News