घुग्घुस (चंद्रपुर) : शहरातील सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीतर्फे रुग्णांची ५५ वी तुकडी विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून नागपूरला भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली.
याप्रसंगी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या की मागील अनेक वर्षांपासून सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे कार्य निरंतर सुरु आहे. या अगोदर 10 हजाराच्या वर रुग्णांना निःशुल्क मदत करण्यात आली आहे. रुग्णसेवेचे पवित्र कार्य असेच सुरू राहणार आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात २ हजारांच्यावर रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते त्यातील दुसरी ४२ रुग्णांची तुकडी रवाना करण्यात आली. या रुग्णांच्या विविध आजारांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाचे माजी सरपंच संतोष नुने, अजय लेंडे, सुनंदा लिहीतकर व रुग्णांची उपस्थिती होती.




