जळगाव : जळगाव पोलीस हद्दीतील पाचोरा स्थानिक पोलिसांनी माहिजी नाका परिसरात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १८ तलवारी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹५४,०००/- एवढी आहे.
या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.





