घुग्घुस (चंद्रपूर) | १३ जून २०२५ रोजी शिवसेना (उबाठा) तर्फे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार, १३ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता गांधी चौक, घुग्घुस येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शोकाकुल वातावरणात मेणबत्त्या पेटवून आणि दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी शिवसेना (उबाठा) घुग्घुस शहर चे अमित बोरकर यांच्यासह गणेश उईके, मनोज पाराशर, बंटी घोरपडे, हेमराज बावने, प्रभाकर चिकनकर, बाळू चिकनकर, अजय जोगी, चेतन बोबडे, गणेश शेंडे, योगेश भांदककर, रघुनाथ धोंगडे, मारोती जुमनाके, वेदप्रकाश मेहता, गजानन बांदुरकर, लक्ष्मण बोबडे, अनुप कोंगरे, किशोर चौधरी, हर्ष चौधरी, राजू नाथर, प्रफुल खोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शांततेत पार पडले असून उपस्थितांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त केली.