चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिसांनी अॅल्युमिनियम वायर चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक केली आहे. आरोपी (वय ३६), रा. ओदेला, पेदापेल्ली, तेलंगणा, हा गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आला.
बल्लारपूर येथील शेत शिवारातील अॅल्युमिनियम विद्युत तार अंदाजे ₹1,27,600/- किमतीचे चोरट्यांनी लंपास केले होते. 04/02/2024 रोजी या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे सहकारी हे आधीच अटकेत घेतले होते.
आरोपी यानेच सदर गुन्ह्याचे कट कारस्थान रचले होते व त्यानेच आपल्या सहकाऱ्यांसोबत अॅल्युमिनियम विद्युत तार चोरीचा डाव आखला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे.




