Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्व. पुंडलिकभाऊ उरकुडे यांच्या स्मृतिदिनी समाजसेवेचा आदर्श उपक्रम

घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस, १८ जून २०२५ रोजी येथील ज्येष्ठ भाजपा नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. उरकुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना, महिलांना आणि नगर परिषदेच्या कचरागाडीत कार्यरत महिलांना टिफिन बॉक्स, साड्या व ब्लॅंकेट यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात चिन्नाजी नलभोगा, साजन गोहने, बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, श्रीकांत सावे, शाम आगदारी, कोमल ठाकरे, गणेश राजूरकर, संदीप तेलंग, हनुमान खडसे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, सुनंदा लिहीतकर, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

या प्रसंगी विवेक बोढे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, “तळागाळातील गरजूंना निस्वार्थ सेवेने मदत करणारा खरा जननायक म्हणजे स्व. पुंडलिकभाऊ उरकुडे.” त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही अनेक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

हा स्मृतिदिन सेवा, कृतज्ञता आणि समाजिक बांधिलकीने भरलेला ठरला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News