Thursday, July 9, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव : चंद्रपूर प्रकल्प कार्यालयात गुणवंतांचा सत्कार

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शैक्षणिक सत्र 2025 पासून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमात, प्रकल्पातील शासकीय, अनुदानित व एकलव्य आश्रमशाळांमधून प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पोळ, राजीव बोंगिरवार, राजेश धोटकर हे सहायक प्रकल्प अधिकारी तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना राचेलवार म्हणाले, “बोर्ड परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रथमच प्रकल्प कार्यालयाच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे व त्यांच्या यशाची दखल घेणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. दरवर्षी अशा प्रकारचा सत्कार करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यार्थ्यांना 10 वी व 12 वी नंतरच्या करिअरविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

इयत्ता 10 वी –

शितल भुजंगराव कन्नाके – प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, राजुरा), सानिया छबिलदास सिडाम – द्वितीय (अनुदानित आश्रम शाळा, राजुरा), आराधना अनिल कुंभरे – तृतीय (अनुदानित आश्रम शाळा, सरडपार).

इयत्ता 12 वी (विज्ञान) –

अमन दीपक कोडापे – प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, भारी), दिपाली कैलास येरमे – द्वितीय (अनुदानित आश्रम शाळा, गडचांदूर).

इयत्ता 12 वी (कला) –

सुशिला विजय गावडे – प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, सरडपार), विद्या सुर्यभान आत्राम – द्वितीय (शासकीय आश्रम शाळा, देवाडा).

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News