Saturday, November 7, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चांदूररेल्वे आयटीआयला सी.व्ही रमण यांचे नाव

अमरावती : मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राज्यातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख मिळाली आहे. त्यानुसार चांदूर रेल्वे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण डॉ.सी.व्ही.रमण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे, जि.अमरावती असे करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी राज्यातील केवळ दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना नावे होती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाने शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागविल्या. त्यानुसार १३२ आयटीआयचे नामकरण करण्यात आले आहे. यात अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांचा समावेश आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News