बुधवारी डॉ. मोहन भागवत चंद्रपूरात
चंद्रपूर: मागील 29 वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव बुधवार, दि. 25 डिसेंबर 2024 रोजी शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर तर सचिव ऍड. निलेश चोरे उपस्थित राहतील, अशी माहिती शाळेच्या प्राचार्या अरुंधती कावडकर यांनी सोमवारी (दि. 23) दिली.
प्राचार्य कावडकर यांनी सांगितले की, या कार्यक्रमात शाळेच्या दैनंदिन शिक्षणातून दिल्या जाणाऱ्या सैनिकी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली जातील. यावेळी समदेशक कमांडर सुरींदरकुमार राणा आणि विद्यार्थी नायक भानुदास वाढणकर देखील उपस्थित राहणार आहेत.
सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या वार्षिकोत्सवाचा हा कार्यक्रम शाळेच्या शिस्तबद्धतेचे व सैनिकी मूल्यांचे उत्तम दर्शन घडवणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




