Friday, July 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

हडपसर विधानसभा मतदारसंघात सुमारे ४ लाख मतदार ओळख चिठ्ठ्यांचे वितरण

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून हडपसर मतदार संघात ५३२ मतदान केंद्र आहेत. मतदार संघात आत्तापर्यंत ३ लाख ९८ हजार २७३ मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी कळविली आहे.

मतदारांना त्यांची मतदान केंद्रे, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप सुरु आहे. या मतदार चिठ्ठीवर मतदाराची माहिती, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदानाची तारीख व वेळ याचा समावेश आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये ६ लाख २५ हजार ६७५ इतकी मतदारसंख्या आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदारांना आपल्या केंद्राचे नाव आणि स्थळ, यांची माहिती होऊन मतदान प्रक्रियेस मदत होण्याच्या दृष्टीने मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप ६८ क्षेत्रीय अधिकारी, २५ पर्यवेक्षक आणि ५२५ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वितरण करण्यात येत असल्याचेही डॉ.मोरे यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News