Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

इव्हिएम मशीन बाइक वरुन घेऊन जात असल्याच्या कारणावरुन अमरावतीत राडा

अमरावती : बुधवार, दिनांक २०.११.२०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर ०३७- बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपाल नगर येथील इव्हिएम मशीन बाइक वरुन घेऊन जात असल्याच्या कारणावरुन अमरावतीत गोपाल नगर मध्ये राडा, चार इव्हिएम बाइक वरुन नेल्याचा आरोप, उमेदवार तेथे दाखल अशा आशयाची बातमी विविध वृत्तवाहिनीवरुन प्रसारित होत असल्याचे निर्दशनास आले. याबाबत वस्तूस्थिती अशी आहे की , ज्या मतदान केंद्रास अनुसरुन सदर बातमी प्रसिध्द झाली आहे ते मतदान केंद्र हे गोपाल नगर मुख्य वाहतूकीच्या रस्त्यापासून अरुंद रस्त्यावर आतमधील बाजूला असलेल्या राजीव गांधी शाळेमध्ये आहे. त्यामूळे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेनंतर मतदान कर्मचारी व त्यांचेसोबतचे मतदान साहित्य व इव्हिएम मशीन संकलन करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या बस हया मतदान केंद्राच्या दारापर्यंत पोहचू शकत नसल्याने संबंधित मतदान कर्मचारी ईव्हिएम मशीन घेवून बस पर्यंत बाइक वर जात आहे अशी अफवा काही पक्षांचे कार्यकर्ते यांनी प्रसारित करुन त्यातून गैरसमज निर्माण होवून सदरची बातमी चूकिच्या पध्दतीने वृत्तवाहिनीमध्ये प्रसिध्द होत असल्याचे निर्दशनास आले आहे.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर माहिती घेतली असता सर्व इव्हिएम सुरक्षित असल्याचे व निवडणूक कर्मचारी यांचे ताब्यात असल्याचे व इव्हिएम बाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे दिसून आले आहे . याबाबत कोणतीही शंका कोणीही बाळगू नये असे प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News