Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शांतता समितीची सभा संपन्न

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. गणेशोत्सव व ईद सन शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून धार्मिक सण उत्साहात साजरे करावे असे आवाहन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले. शांतता समितीच्या सदस्यांनी विविध प्रकारच्या समस्या मांडल्या, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, पोलिस विभागाकडून मिरवणुकीत डी जे चा वापर करू नये. असे आवाहन केले. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा असे आवाहन महावितरण चे उप कार्यकारी अभियंता संदिप शेटे यांनी केले. मिरवणुकीच्या मार्गावर झालेले अतिक्रमण तातडीने काढले जाईल असे आश्वासन नगर परिषदेचे अधिकारी संमती जैन यांनी दिले.

बैठकीस नायब तहसीलदार बालाजी कौशल्ये, डॉ.रामदास शिंदे, रविंद्र किटे, शांतता समितीचे सदस्य, उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News